21 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार

 

पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य शासनातर्फे आयोजित केला जाणारा यंदाचा 21 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पिफ येत्या 2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष आणि  महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

यावर्षी महोत्सवासाठी 72 देशांमधून आलेल्या 1574 चित्रपटांपैकी 140 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यंदा हा महोत्सव केवळ चित्रपटगृहात होणार असून, महोत्सव पाहण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया उद्यापासून महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे. महोत्सवासाठी निवड झालेल्या आणि जागतिक स्पर्धा विभागात 14 चित्रपटांची घोषणा यावेळी करण्यात आली.