भारत आणि जपान यांचा संयुक्त हवाई संरक्षण सराव, 'वीर गार्डियन 2023' संपन्न
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दल (आयएएफ) आणि जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्स (जेएएसडीएफ) यांच्यातील द्विपक्षीय संयुक्त हवाई सराव, 'वीर गार्डियन 2023' चा उद्घाटनपर कार्यक्रम 26 जानेवारी 2023 रोजी जपानमध्ये संपन्न झाला.
जेएएसडीएफने आपल्या एफ-2 आणि एफ-15 विमानांसह सरावात भाग घेतला, तर आयएएफ दलाने एसयू-30 एमकेआय विमानांसह भाग घेतला. आयएएफची लढाऊ तुकडी, एक आयएल-78 फ्लाइट रिफ्यूलिंग विमान आणि दोन सी-17 ग्लोबमास्टर स्ट्रॅटेजिक एअरलिफ्ट ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टने सुसज्ज होती.
16 दिवसांच्या या संयुक्त प्रशिक्षणादरम्यान, दोन्ही हवाई दलांनी अनेक सराव कार्यान्वयन परिस्थितींमध्ये जटिल आणि व्यापक हवाई युद्धसराव करत आहेत. या सरावात दोन्ही हवाई दलांकडून अचूक नियोजन आणि कुशलतेने अंमलबजावणी करण्यात आली. आयएएफ आणि जेएएसडीएफ दृश्य टप्प्यातील तसेच त्यापलिकडील रेंज सेटिंग्जमध्ये हवाई लढाऊ सराव, अंतर्च्छेदन आणि हवाई संरक्षण मोहिमांमध्ये सक्रीय आहेत. दोन सहभागी हवाई दलांचे जवान देखील एकमेकांच्या लढावू विमानातून एकमेकांच्या कार्यान्वयनाची सखोल माहिती मिळविण्यासाठी उड्डाण करत होते.
'वीर गार्डियन 2023' या सरावाने दोन्ही हवाई दलांना परस्पर सामंजस्य वाढवण्याची संधी मिळत आहे. या सरावात आयएएफ आणि जेएएसडीएफ कर्मचार्यांमध्ये प्रत्यक्ष परस्परसंवाद देखील पाहायला मिळाला. यात दोन्ही बाजूंनी विविध पैलूंवर चर्चा झाली. यामुळे सहभागी तुकड्यांना एकमेकांच्या सर्वोत्तम कार्यपद्धतींबद्दल अमूल्य अंतर्दृष्टी मिळू शकली आणि परस्परांच्या क्षमता अनुभवामधून शिकता आले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.