चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना RTPCR चाचणी अनिवार्य

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून भारतात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना या देशांमधून निघण्यापूर्वी RTPCR चाचण्या करणं अनिवार्य असेल.

प्रवाश्यांना १ जानेवारी पासून आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल. भारताचा प्रवास सुरू करण्यापूर्वी ७२ तासांच्या आत ही चाचणी करण्यात यावी, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. ही चाचणी सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या अनियमित दोन टक्के चाचण्यांव्यतिरिक्त असेल.