भारत आणि श्रीलंकेदरम्यान पुढील महिन्यापासून प्रवासी बोट सेवा सुरु होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंकेदरम्यान पुढील महिन्यापासून प्रवासी बोट सेवा सुरु होणार आहे. भारतातील पुदुच्चेरी आणि श्रीलंकेच्या जाफना शहरातील कनकेसंथुराई बंदर यांच्या दरम्यान या बोटी ये-जा करतील.

भारत सरकारनं या सेवेकरता संमती दिल्याचं श्रीलंकेचे बंदर आणि जहाज उद्योग मंत्री निमल श्रीपाद डिसिल्वा यांनी सांगितलं. दक्षिण भारतातून श्रीलंकेतील त्रिंकोमाली आणि कोलंबो इथंही प्रवासी वाहतूक सेवा सुरु करण्यात येतील असंही ते म्हणाले. 

एकेरी प्रवासाकरिता प्रति प्रवासी सुमारे पाच हजार रुपये शुल्क आकारावं लागेल आणि प्रत्येक प्रवासी 100 किलोपर्यंत सामान नेऊ शकेल असं बोट सेवा देणाऱ्या आयोजकांनी सुचवलं आहे.