महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत राज्य विधीमंडळात येत्या २६ डिसेंबरला ठराव मांडण्यात येणार

 


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत राज्य विधीमंडळात येत्या २६ डिसेंबरला ठराव मांडण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज नागपूरमधे विधानभवन परिसरात वार्ताहरांना ही माहिती दिली. आपला ठराव कर्नाटक विधानसभेत मंजूर झालेल्या ठरावापेक्षाही कणखर असेल, असं ते म्हणाले. हा ठराव आजच मांडण्यात येणार होता, मात्र आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे तो पुढं ढकलण्यात आला, असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादाबद्दल दिलेला शब्द पाळला नाही याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार आहोत, असं ते म्हणाले.