जम्मू-काश्मीरमधल्या स्थितीत लक्षणीय सुधारणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारच्या दहशतवादाविरुद्धच्या कठोर धोरणामुळं जम्मू-काश्मीरमधल्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये २०१८ मध्ये ४१७ दहशतवादी हल्ले झाले होते, २०२१ मध्ये हे प्रमाण २२९ पर्यंत कमी झालं. या वर्षी नोव्हेंबरपर्यंत १२३ दहशतवादी हल्ले झाले असून, ३१ सुरक्षा रक्षकांचा आणि  ३१ नागरिकांचा मृत्यू झाला.

गेल्या ११ महिन्यांत सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकींमध्ये १८० दहशतवादीही ठार झाले असल्याची माहिती राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी काल दिली.