सिक्कीममध्ये भारतीय लष्कराचा ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराच्या १६ जवानांचा मृत्यू

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर सिक्कीममध्ये झेमा इथं आज भारतीय लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराचे १६ जवान मृत्युमुखी पडले, तर चार जवान जखमी. अपघातग्रस्त ट्रक लष्कराच्या ताफ्याचा भाग होता. हा ताफा आज सकाळी चट्टेन इथून थांगूच्या दिशेने  निघाला होता. अपघातानंतर ताबडतोब बचाव कार्य सुरु झालं आणि अपघातात जखमी झालेल्या जवानांची हवाई मार्गाने सुटका करण्यात आली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  तीव्र शोक व्यक्त केला आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांप्रति त्यांनी सह-वेदना व्यक्त केली असून, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना केली आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी  ट्विटर संदेशात म्हटलं आहे. 

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image