महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा निर्णय न्यायालयात होईल - देवेंद्र फडणवीस

 


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा निर्णय न्यायालयात होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे. दोन्ही राज्य न्यायालयापुढे आपल्या भूमिका मांडत आहेत. दरम्यान, राज्य सरकारनं समन्वयासाठी नियुक्त केलेल्या दोन मंत्र्यांचा उद्याचा बेळगाव दौरा रद्द करण्यात आला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई हे उद्या बेळगावला जाणार होते. कर्नाटकात आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा दौरा रद्द करण्यात आला आहे. 

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image