एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं विजयाची आगेकूच ठेवली कायम

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉकीमध्ये एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं विजयाची आगेकूच कायम ठेवली आहे. भारतानं ब गटात पहिल्या सामन्यात चिलीवर मात केल्यानंतर काल दुसऱ्या सामन्यातही जपानवर २-१ अशी मात केली.

स्पेसनमधील व्हॅलेन्शिया इथं ही स्पर्धा सुरू आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारताला या गटात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उद्या होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक ठरणार आहे.