‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेसह ‘वेद ते विवेकानंदांपर्यंतचा’ प्रवास या शताब्दी सोहळ्यात पाहता येईल-प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील संतांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेला बळ देऊन जगाला एकत्र बांधलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अहमदाबाद येथील ‘प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सवाच्या’ उद्घाटन समारंभाला संबोधित करताना ते बोलत होते. मोदी म्हणाले की, भारतीय संत परंपरा या केवळ संस्कृती, पंथ, आचार आणि विचारधारा यांच्या प्रचारापुरत्या मर्यादित नाहीत. ‘वेद ते विवेकानंदांपर्यंतचा’ प्रवास, आज या शताब्दी सोहळ्यात पाहता येईल, असंही प्रधानमंत्री म्हणाले.

भक्तांच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित करताना प्रधानमंत्री म्हणाले की, प्रमुख स्वामी महाराजांनी आपल्या निष्कलंक सेवा, नम्रता आणि बुद्धीनं  जगभरातील असंख्य लोकांच्या मनाचा ठाव घेतला. ते म्हणाले की, प्रमुख स्वामींचा मानवतेच्या सेवेवर विश्वास असून प्रत्येकाच्या जीवनाचं अंतिम ध्येय सेवा हेच असायला हवं. मोदी म्हणाले की, हा भव्य कार्यक्रम केवळ जगालाच आकर्षित करणार नाही तर येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल आणि प्रभावित करेल. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, BAPS प्रमुख महंत स्वामी उपस्थित होते.