२०२२-२३ मध्ये १२ हजार २०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट- नितीन गडकरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं २०२२-२३ मध्ये १२ हजार २०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं.

गेल्या महिन्यापर्यंत चार हजार ७६६ किलोमीटरचं कंत्राट झालं असून चालू आर्थिक वर्षात एकूण दोन हजार किलोमीटर्स लांबीचे ४, ६ आणि ८ लेनचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहेत. हे काम गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत बांधण्यात आलेल्या १ हजार ८०६ किलोमीटर्सपेक्षा जास्त आहे, असं गडकरी यांनी सांगितलं.