जगात मेट्रो श्रेणीतली सर्वात लांब डबल डेकर व्हाया-डक्टची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महा मेट्रो नागपूरच्या वर्धा रोड डबल डेकर व्हाया-डक्टची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतली सर्वात लांब डबल डेकर म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल केंद्रीय महामार्ग, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांचा सत्कार केला. खासदार महोत्सवांतर्गत काल हा सत्कार झाला. महा मेट्रोमुळे हा डबल डेकर पूल भारतात पहिल्यांदा झाला आहे आणि आपण त्याचा उपयोग करत असल्याचं ते म्हणाले. या वर्षी माझ्या विभागाशी किंवा कामाशी संबंधित गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधे ८ विविध नोंदी झाल्याचा अतिशय आनंद झाल्याचंही ते म्हणाले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तसंच महा मेट्रोच्या चमूचं गडकरी यांनी ट्विट संदेशात अभिनंदन केलं आहे. या प्रकल्पाची नोंत आशिया बूक आणि इंडिया बूकमधे याआधीच झाली आहे. गिनीज बूकमधे त्याची नोंद होणं ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचं त्यांनी सांगितलं.