त्र्यंबकेश्वर परिसरातलं ९७ चौरस किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात, गोदावरी नदीचं उगमस्थान म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरातलं ९७ चौरस किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यामुळे ब्रह्मगिरी परिसरात गौण खनिजासाठी बेकायदेशीर खोदकामाला पायबंद बसणार आहे.

नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरसह कळवण आणि इगतपुरी तालुक्यातल्या काही भागांचा समावेश केला आहे. त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीसह वाघेरा, वरसविहीर, गोरठाण, आंबोली, वेळुंजे, अंबई, काचूर्ली, कळमुस्ते, उभाडे, आळवंड, मेटघर किल्ला, चंद्रयाची मेट, अस्वली हर्ष, हर्षवाडी, आव्हाटे, वाढोली, कोजुली, पाहीन, भिलमाळ, त्र्यंबकेश्वर आदी गावांचा परिसर संवर्धन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून ब्रह्मगिरी परिसरात खोदकाम करण्याचे प्रकार वाढल्यानं पर्यावरण प्रेमींनी आंदोलन करीत ब्रह्मगिरी बचाव समिती स्थापन केली होती.