देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ हजार ९६ नवीन रुग्ण

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या १ हजार ९६ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर १९० रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. सध्या देशात उपचारधीन रुग्णांची एकूण संख्या ३ हजार ४२८ असून रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ८ दशांश टक्के आहे.