प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन यांच्या पार्थिवावर आज गांधीनगर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीमती हिराबेन यांच्या पार्थिवाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अग्नी दिला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह मोदी कुटुंबातले सदस्य, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि इतर नातेवाईक अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित होते. अहमदाबाद इथं एका रुग्णालयात आज पहाटे साडेतीन वाजता निधन झालं. त्या 100 वर्षांच्या होत्या.