माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आर्थर रोड कारागृहातून मुक्तता

 


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली आहे. गेल्या १४ महिन्यांपासून ते तुरुंगात होते. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना आधीच जामीन मंजूर केला होता.  परंतु उच्च न्यायालयानं सोमवारी या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानं देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. विशेष न्यायाधीश एस.एम. मेंजोगे यांनी आज सुटकेचा आदेश जारी केल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे आदी ज्येष्ठ नेते, देशमुख यांच कुटुंबीय तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत ऑर्थररोड कारागृहासमोर गर्दी केली होती.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image