अहमदनगरचं नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची दीपक केसरकर यांची माहिती

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मजिल्ह्याचं नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याबाबत शासन सकारात्मक असून जिल्ह्याची माहिती आल्यानंतर  केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता त्यावेळी केसरकर बोलत होते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अहमदनगरच्या नामांतरसाठी नाशिकचे विभागीय आयुक्त आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना परिपूर्ण प्रस्ताव, माहिती पाठवायला कळवल्याचही केसरकर म्हणाले.  अहमदनगर महापालिका, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पोस्ट कार्यालय, तहसीलदार यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबतही कळविण्यात आलं असल्याचं ते म्हणाले.