औद्योगिक वसाहतीतल्या कामगारांना किमान वेतन न देणाऱ्या कंपन्यांविषयी तक्रार मिळाली तर तत्काळ कारवाई केली जाईल - सुरेश खाडे

 


मुंबई (वृत्तसंस्था) : औद्योगिक वसाहतीतल्या कामगारांना किमान वेतन न देणाऱ्या कंपन्यांविषयी तक्रार मिळाली तर अशा कंपन्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असं  कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिकमधे विभागीय कामगार आढावा बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी, कामगारांसाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजनांची माहिती घेतली. या बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव डॉ. विनिता सिंगल, कामगार आयुक्त सुरेश जाधव यांच्यासह धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांचे विभागप्रमुख उपस्थित होते.