गेल्या 8 वर्षांत देशातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत 67 टक्क्यांनी वाढ

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या गेल्या  आठ वर्षांमध्ये 67 टक्के ने वाढली आहे अशी माहिती आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी संसदेत दिली.  2014 पूर्वी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या जागांची संख्या एकावन्न हजार 348 होती. ती आता 96 हजार 77 झाली असल्याचंही त्यानी नमूद केलं.  पदव्युत्तर शिक्षणासाठीही आता 31 हजार 185 जागा आहेत. नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी सरकार केंद्रीय क्षेत्र परियोजना राबवत आहे.  या अंतर्गत नवीन एम्सची उभारणी होत असून 22 एम्सना मंजूरी मिळाली आहे आणि त्यातील 19 एम्समध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू झाले आहेत अशी माहितीही पवार यांनी दिली.