भारत स्वीकारणार फ्रान्सकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GPAI वरील जागतिक भागीदारीचं अध्यक्षपद

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, आज फ्रान्सकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GPAI वरील जागतिक भागीदारीचं अध्यक्षपद स्वीकारणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर टोकियो इथे होणाऱ्या GPAI बैठकीत फ्रान्सकडून अध्यक्षपदाचा प्रतिकात्मक ताबा घेतील. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचा संघ असलेल्या G२० चं अध्यक्षपद स्वीकारल्या पाठोपाठ ही एक महत्वाची घटना आहे. GPAI हा जबाबदार आणि मानव-केंद्रित विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI च्या वापरासाठी समर्थन देणारा एक आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे. GPAI हा यूएस, यूके, युरोपेना युनियन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, मेक्सिको, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि सिंगापूरसह २५ सदस्य देशांचा उपक्रम आहे.