बोर ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील सुमारे १०० घरांना गेले तडे

 


मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चालू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटी करणाच्या कामासाठी दररोज करण्यात येत असलेल्या बोर ब्लास्टींगमुळे भुंकपा सारखे हादरे वहाळ गावांतील रहिवाशांच्या घरांना बसत आहेत. सततच्या बोर ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील सुमारे १०० घरांना तडे गेले आहेत. अशी  माहिती ग्रामपंचायत सदस्य अमित तसेच चेतन घरत यांनी दिली आहे. यामुळे रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बोर ब्लास्टींगचे काम बंद न केल्यास विमानतळाचे कामकाज बंद करण्यासाठी ग्रामस्थांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा कडक इशारा वहाळ ग्रामपंचायतीने सिडकोला दिला आहे. नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी उरण विधानसभा मतदारसंघातील गावांची जमिन शासनाने सिडकोच्या माध्यमातून संपादीत केली.  नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे ठेकेदार अदानी इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीला पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा विभागाने कंट्रोल ब्लॉस्ट करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. मात्र शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक  स्फोटाकांच्या प्रमाणाचा वापर मेसर्स. अदानी इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीकडून केला जात आहे.