आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य मंत्रालयाकडून आजपासून बंद
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आजपासून बंद केला आहे. जागतिक स्तरावर आणि भारतातही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानामुळे कोविड-१९ चं प्रमाण कमी झाल्यामुळे सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता सर्व प्रवाशांनी त्यांच्या देशातील कोविड विरूद्ध मान्यताप्राप्त वेळापत्रकानुसार पूर्ण लसीकरण करणं आवश्यक आहे; विमान प्रवासापूर्वी बंधनकारक असलेली आरटी-पीसीआर चाचणी मात्र बंद करण्यात आली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.