संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ते २९ डिसेंबर पर्यंत चालेल. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की अधिवेशन २३ दिवस चालणार असून त्यात एकूण १७ बैठका होतील. अधिवेशनात महत्त्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा होईल असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.