नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबईतल्या पीएमएलए विशेष न्यायालयानं फेटाळला

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबईतल्या पीएमएलए विशेष न्यायालयानं आज फेटाळला. या प्रकरणी त्यांना फेब्रुवारीमधे ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं अटक केली होती. ईडीनं ही कारवाई करेपर्यंत आपल्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता, असं मलिक यांनी या जामीन अर्जात म्हटलं होतं. त्यांच्या जामीन अर्जाला ईडीनं तीव्र विरोध केला होता.