राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती म्हणून त्यांचा ओडिशा राज्यातला हा पहिलाच दौरा आहे. आज त्यांनी पुरी इथल्या श्री जगन्नाथ मंदिरात भगवान जगन्नाथांचं दर्शन घेतले. तर उद्या, भुवनेश्वरमधल्या तपोवन शाळेला राष्ट्रपती भेट देणार असून त्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधतील. तसंच भुवनेश्वर इथल्या जयदेव भवन इथून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.