शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशामुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची अजित पवार यांची टीका

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशामुळेचं प्रकल्प राज्याबाहेर गेले असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. शिर्डी इथं आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मंथन: वेध भविष्याचा हे शिबिर होत असून, त्याआधी पवार वार्ताहरांशी बोलत होते. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांना मदत करेल, असं वाटत नाही, असं पवार यावेळी म्हणाले.