उत्तर कोरियानं केलेल्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचा भारतानं केला निषेध

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर कोरियानं केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचा काल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत, भारतानं निषेध केला आहे. त्यामुळे प्रादेशिक क्षेत्राच्या शांतता आणि सुरक्षेला धोका असल्याचं म्हटलं आहे. डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाने अलीकडेच केलेल्या या प्रक्षेपणाचा निषेध केल्याचं संयुक्त राष्ट्रांमधल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी,राजदूत रुचिरा कंबोज यांनी सांगितलं.

गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर सुरक्षा परिषदेची बैठक घेण्यात आली होती. हे प्रक्षेपण कोरियाशी संबंधित सुरक्षा परिषदेच्या कराराचं उल्लंघन असून शांतता आणि सुरक्षिततेवर त्याचा परिणाम होत आहे असं कंबोज यांनी सांगितलं.