राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद झाली, २११ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यात १ हजार ७०५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी सर्वात जास्त ५८७ रूग्ण मुंबईत आहेत. त्याखालोखाल ३६२ रूग्ण पुण्यात तर ३४६ रुग्ण ठाण्यात आहेत.राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १५ शतांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८२ शतांश इतके आहे.