'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन

 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी : 'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमे अंतर्गत आमदार तथा भाजपाचे शहर अध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून 'रीव्हर सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि. २७ नोव्हेंबर) सकाळी पावणे सहा वाजता, भोसरी गावजत्रा मैदान येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार नेते सचिन लांडगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

मागील पाच वर्षांपासून रीव्हर थॉन रॅली आयोजित करण्यात येत असते. यावर्षी पर्यावरण रक्षणासाठी 'रिसायकल - रिड्युस - रियुज' हा विषय घेऊन 'सायक्लोथॉन' ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या रॅलीसाठी अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सायकलपटू प्रिती म्हस्के, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सचिन लांडगे यांनी दिली.

भोसरी गावजत्रा मैदानावरून सकाळी पावणे सहा वाजता रॅलीची सुरूवात होईल. रॅलीचा मार्ग पुढीलप्रमाणे - 5 किलोमीटर लहान मुले महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी गाव जत्रा मैदान, लांडगे पेट्रोल पंप, इंद्रायणी नगर, शांतीनगर, गाव जत्रा मैदान;

15 किलोमीटर - गाव जत्रा मैदान, जय गणेश साम्राज्य, क्रांती चौक, स्पाईन सिटी मॉल चौक, गवळीमाथा, गाव जत्रा मैदान;

25 किलोमीटर - गाव जत्रा मैदान, जय गणेश साम्राज्य, क्रांती चौक, कृष्णानगर, स्पाईन सिटी मॉल चौक, गवळीमाथा, गाव जत्रा मैदान असा आहे.

या वर्षी Recycle, Reduce, Reuse to Save Enviorment हि संकल्पना मांडत आहोत. या विशेष कार्यक्रमांतर्गत प्रत्येक घरापर्यंत पोहचण्यासाठी एक विशेष मोहिम राबवून पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळा, सोसायटी, कंपन्यामध्ये जावून पर्यावरण संवर्धना अंतर्गत सायकल चालवा पर्यावरण वाचवा, नदी स्वच्छता या विषयांतर्गत आम्ही सर्व पर्यावरण प्रेमी जनजागृती करत आहोत व रिव्हर सायक्लोथॉन रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहोत.

या अभिनव उपक्रमाला रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी, पर्यावरण गतविधी, होप मानसिक पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्र, डॉक्टर्स असोसिएशन, फार्मासिस्ट असोसिएशन, वकील संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, माजी सैनिक संघटना, पतंजली योग, महाराष्ट्रातील सर्व सायकल प्रेमी संस्था, सर्व पर्यावरणप्रेमी संस्था आदींनी पाठींबा दर्शविला असून प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यातील एक रॅली ते लीड करत आहे. उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. याही वर्षी अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्टस फॉडेशन व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका , पर्यावरणप्रेमी संस्थां यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे.

'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिम अभियान अंतर्गत महानगरपालिकेच्या सर्व शाळा व त्यातील विद्यार्थी आणि खाजगी ६० पेक्षा अधिक शाळांमध्ये शालेय स्तरावर चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली, यामध्ये १५०००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला , त्यामधून विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये मनपा स्तरावर आंतर शालेय चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, यामधील विजेत्यांना रिव्हर सायक्लोथॉन मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी २५००० सायकलपटू सहभागी होतील अशी माहिती डॉ. निलेश लोंढे यांनी दिली.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image