नचेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालची क्रिकेट निवड समिती बरखास्त

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांची राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली आहे. नवीन समितीच्या सदस्यपदासाठी  बीसीसीआयनं  अर्ज मागवले असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर आहे.