चीनमध्ये कोविडचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं लागू केलेल्या कठोर उपाय योजनांच्या विरोधात निदर्शनं आणखी तीव्र

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये कोविडचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं लागू केलेल्या कठोर उपाययोजनांच्या विरोधातली निदर्शनं आणखी तीव्र झाली आहेत. वुहान शहरात शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या झिरो-कोविड धोरणाविरोधात जोरदार निदर्शनं केली. चीनच्या बीजिंग आणि शांघायसारख्या मोठ्या शहरांमध्ये सरकारच्या कोविड धोरणा विरोधात निदर्शनं सुरु आहेत.