दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभरात आदरांजली वाहण्यात येत आहे. इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबाद इथं झाला. जानेवारी 1966 ते मार्च 1977 आणि जानेवारी 1980 ते ऑक्टोबर 1984 या काळात त्या प्रधानमंत्री होत्या. दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असं प्रधानमंत्री नरेंद्र  मोदींनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाअर्जुन खरगे यांनी शक्तीस्थळावर जाऊन अभिवादन केलं.