सायबर आणि माहिती युद्धाचा धोका हे मोठं आव्हानं - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेमधली दरी कमी होत असून, सायबर आणि माहिती युद्धाचा धोका हे मोठं आव्हानं असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. दिल्लीतल्या नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या दीक्षांत समारंभात आज बोलताना सिंग म्हणाले की, वीज निर्मिती, वाहतूक, सार्वजनिक क्षेत्र आणि उत्पादन उद्योग यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा सायबर हल्ल्यांना बळी पडतात. माहिती युद्धाच्या आव्हानावर, संरक्षण मंत्री म्हणाले की, देशाच्या राजकीय स्थिरतेला धोका निर्माण होण्याची संभाव्यता आहे. ते म्हणाले की सोशल मीडिया आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर संघटित जनतेचं मत किंवा त्यांचा वैचारिक  दृष्टीकोन बदलण्यास  प्रभावी ठरत आहे.