भारताच्या परकीय चलनसाठ्यात ६५६ कोटी अमेरिकी डॉलरची वाढ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या परकीय चलनसाठ्यात आधीच्या तीन आठवड्यांच्या तुलनेत, २८ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात प्रथमच वाढ नोंदवली गेली आहे. आशियातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा परकीय चलन साठा २८ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात ६५६ कोटी डॉलर्सनं वाढून ५३१ अब्ज ८ कोटी झाला, असंल्याचं रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे.

ऑक्टोबर २०२१ मध्ये, देशाच्या परकीय चलनसाठ्यानं ६४५ अब्ज अमेरिकन डॉलर इतका सर्वकालीन उच्चांक गाठला होता. जागतिक घडामोडींमुळे निर्माण झालेल्या दबावामुळे मध्यवर्ती बँकेला हा साठा वापरावा लागल्यानं राखीव रोकड कमी होत आहे. रिझर्व्ह बँकेनं काल प्रसिद्ध केलेल्या साप्ताहिक सांख्यिकी आकडेवारीनुसार, सोन्याच्या साठ्याचं मूल्य ५५ कोटी ६० लाख अमेरिकी डॉलरनं वाढून ३७ अब्ज ७७ कोटी  अमेरिकन डॉलर  झालं आहे.