भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी माजी धावपटू खासदार पी टी उषा यांची बिनविरोध निवड

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी, भारताच्या सुवर्ण कन्या अशी ख्याती असलेल्या दिग्गज माजी धावपटू आणि राज्यसभा सदस्य पी टी उषा यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुढच्या महिन्यात अध्यपदाची निवडणूक होणार होती. पण फक्त पी टी उषा यांनीच अर्ज दाखल केला होता. भारतीय ऑलिम्पिकच्या ९५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा एका महिलेकडे अध्यक्षपद आलं आहे. त्याचबरोबर या पदापर्यंत पोहाचणारी ती पहिली ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळालेली खेळाडू आहे. अध्यक्षपदावर निवडून आल्याबद्दल कायदा मंत्री किरेन रिजीजू यांनी तिचं अभिनंदन केलं आहे.