छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना राज्यपालांनी सगळ्या मर्यादा सोडल्या असल्याची शरद पवार यांची टीका

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल ही एक संस्था असून त्याच्या काही मर्यादा आणि बंधन असतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्या प्रकरणानंतर राज्यपालांनी छत्रपतींच कौतुक करणारं विधान केलं. मात्र, राज्यभरातून उमटलेल्या प्रतिक्रियांनंतर केलेलं हे विधान म्हणजे उशीराचं शहाणपण आहे, असं ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत म्हणाले. विविध विषयांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं. तसेच राज्यपालांच्या या विधानाची दखल आता राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी घ्यावी. अशा व्यक्तीकडे राज्यपाल पदासारख्या जबाबदाऱ्या देणं योग्य नाही, असंही पवार म्हणाले.