परिचारिकांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२१ चं वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परिचारिकांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२१ चं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. परिचारिका आणि नर्सिंग व्यावसायिकांनी समाजासाठी केलेल्या गुणवत्तेची सेवा ओळखण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं १९७३ मध्ये याची स्थापना केली होती.