सीबीआयची कथित फुटबॉल फिक्सिंग प्रकरणी प्राथमिक चौकशी सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीआयनं कथित फुटबॉल फिक्सिंग प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरु केली आहे. सीबीआयनं यापूर्वी भारतीय फुटबॉल महासंघाला मॅच फिक्सिंग प्रकरणी फूटबॉल क्लब आणि मॅच फिक्सिंग संदर्भातल्या त्यांच्या गुंतवुणकीची माहिती देण्यास सांगितलं होतं. सिंगापूर स्थित मॅच फिक्सरने भारतीय फुटबॉल क्लबमध्ये गुंतवणूक केल्याच्या आरोपावरून सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.