जव्हार-सिलवासा मार्गावर एसटीच्या दोन बसगाड्यांचा अपघात

 


मुंबई (वृत्तसंस्था) :  पालघर जिल्ह्यात जव्हार-सिलवासा मार्गावर आज सकाळी एसटीच्या दोन बसगाड्यांची टक्कर झाली. या अपघातात एका बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही बसमध्ये असलेले सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर जव्हारच्या कुटीर रुग्णालयात उपचार करून त्यांना डिस्चार्ज दिला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दोन्ही गाड्यांच्या चालकांविरुद्ध जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांनी दिली आहे.