पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनामधल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखशी संबंधित मुद्यांवर भारताचा आक्षेप

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनामधल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखशी संबंधित अनेक संदर्भांवर भारतानं आक्षेप घेतला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत असा पुनरुच्चार भारतानं यावेळी केला. भारत सातत्यानं चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर संदर्भात चिंता आणि निषेध व्यक्त करत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image