गुजरात विधानसभा निवडणुक उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात येत्या १ डिसेंबरला ८९ जागांसाठी मतदान होणार असून कालपर्यंत ३१६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होणार असून येत्या १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. आजच्या अखेरचा दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरु आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दिसून येत आहे. प्रचाराचं साहित्य आणि फलकांसाठी जैव विघटन न होणारे पदार्थ, एकदा वापरुन फेकून देण्याचं प्लास्टिक इत्यादीचा वापर करु नये असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. दरम्यान,  काँग्रेसनं आणखी ३३ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.