प्रधानमंत्री शुक्रवारी बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल दोनचं करणार उदघाटन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रवारी बंगळुरू इथल्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल दोनचं उदघाटन करणार आहेत. टर्मिनल दोनमुळे प्रवाशांसाठी चेक-इन आणि इमिग्रेशनसाठी काउंटर वाढणार आहेत. यामुळे दरवर्षी सुमारे ५ ते ६ कोटी प्रवासी या विमानतळावरून प्रवास करू शकणार आहेत. या टर्मिनलमध्ये हिरव्या भिंती, हँगिंग गार्डन आणि खुल्या बागांची निर्मिती यासाठी करण्यात आली आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून ही उद्यानं भारतात तयार करण्यात आली आहेत.