प्रसारभारतीच्या स्थापनेला २५ वर्ष पूर्ण

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसारभारतीच्या स्थापनेला आज २५ वर्ष पूर्ण झाली. १९९७ मधे आजच्या दिवशी संसदेत संमत झालेल्या कायद्यान्वये प्रसारभारती हे वैधानिकदृष्ट्या स्वायत्त महामंडळ अस्तित्वात आलं. प्रसारभारतीत आकाशवाणी आणि दूरदर्शनचा समावेश होतो. देशासमोर किंवा जगासमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली तेव्हा प्रसारभारतीनं कायम जनतेला साथ दिली असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे.