महिला टी-ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा भारतावर १३ धावांनी विजय

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत आज बांगलादेशात सिल्हेट इथं झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतावर १३ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारल्यानंतर पाकिस्ताननं निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १३७ धावा केल्या  होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ डावातले दोन चेंडू बाकी असतानाच १२४ धावांवर गारद झाला. या आधीचे तीन्ही सामने जिंकून भारतीय महिला संघानं आपल्या खात्यात सहा गुण जमा केले आहेत, तर तीन सामन्यांमधे दोन विजय मिळवून गुणतालिकेत पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे.