केदारनाथ आणि यमुनोत्री तीर्थक्षेत्रांचे दरवाजे हिवाळ्यामुळं २७ तारखेला बंद करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड मधल्या केदारनाथ आणि यमुनोत्री तीर्थक्षेत्रांचे दरवाजे हिवाळ्यामुळं या महिन्याच्या २७ तारखेला बंद केले जातील. या महिन्याच्या २६ तारखेला गंगोत्रीचे आणि पुढच्या महिन्यात १९ तारखेला बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे बंद होतील. विजयादशमीच्या मुहूर्तावर मंदिर समितीनं काल ही घोषणा केली.