बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं वेळापत्रक जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं मंडळाच्या संकेतस्थळावर भरता येतील. इयत्ता १२ वी परीक्षेचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारणार असल्यानं विद्यार्थ्यांनी आपले अर्ज उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावेत असं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे.