लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकासमोरच्या एका इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आग

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकासमोरच्या एका १२ मजली इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन विभागानं संध्याकाळी ५ वाजता आगीवर नियंत्रण मिळवलं आणि सुमारे ३३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं. या आगीत कोणीही जखमी झालेलं नाही.