शासनानं ओला दुष्काळ जाहीर करण्याची अंबादास दानवे यांची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्यात अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी केल्यानंतर ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.

अतिवृष्टीनं शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे. तरीही सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला. पीकविमा कंपन्याही शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देत नाहीत तसंच या कंपन्या अतिवृष्टीचे पंचनामे करत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.

राज्य शासनाच्या वतीनं दिवाळीनिमित्त गरिबांना स्वस्त धान्य दुकानामार्फत देण्यात येणारा आनंदाचा शिधा किटवर मंत्र्यांचे छायाचित्र छापण्याच्या आग्रहामुळे हे किट वाटण्यात विलंब झाल्याचा आरोप दानवे यांनी केला.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image