शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष - डॉ.एस.जयशंकर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.

चीनचं परराष्ट्र धोरण आणि नव्या युगातले आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर नवी दिल्ली इथं आयोजित एका व्याख्यानात ते बोलत होते. सध्याचा पेचप्रसंग हा उभय देशांना हितावह नाही यावर त्यांनी भर दिला.

दूरदर्शी उपाय आणि त्यासाठी हवी असलेली इच्छाशक्ती दोन्ही देशांनी दाखवणं गरजेचं आहे. गेली काही वर्ष दोन्ही देशांमधले संबंध आणि उपखंडातल्या संभावना या दोन्हींसाठी आव्हानात्मक होते, असंही जयशंकर म्हणाले.