आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अमेरिकेला रवाना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत.

या दौऱ्यात त्या जी-वीस समुहातील देशांच्या अर्थमंत्र्यांसोबतही चर्चा करणार आहेत. याशिवाय जपान, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, भूतान, न्यूझीलंड, इजिप्त, जर्मनी, मॉरिशस, यूएई, इराण आणि नेदरलँडसह अनेक देशांसोबतच्या द्विपक्षीय बैठकींमध्येही त्या सहभागी होणार आहेत.

देशाच्या धोरणात्मक प्राधान्यक्रमांना अधोरेखित करणं आणि परकीय गुंतवणुकीला सुलभ करण्यासाठीच्या उपाययोजनांवर विचार करणं हा या बैठकींचा उद्देश असेल.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image